महाराष्ट्र वेदभुमी

दोन मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- खैरी बीजेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत पाचगाव भागांतील खाली जागेत असलेल्या खोल खड्डातील पाण्यात बुडवून दोन चिमुकल्या मुलांचा करुण अंत झाला... ही घटना शनिवार (दि. २६) दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली...जी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली... रिधान संजय सहारे (७ वर्ष ) व उत्कर्ष लोकेश लांजेवार (७ वर्ष) असे मृत मुलांची नावे आहेत... दोघेही पाचगाव येथील रहवाशी आहे... पोलीस सूत्रानुसार रिधान संजय सहारे (७ वर्ष) व उत्कर्ष लोकेश लांजेवार (७ वर्ष) दोघेही पाचगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसर्‍या वर्गात शिकणारे विद्यार्थी होते... शनिवारी दुपारी २ वाजता दोन्ही मुले शाळेतून घरी आली... ही मुले दुपारी गावाबाहेरील मैदानात खेळण्यासाठी गेली होती... पावसामुळे काही खोल खड्ड्यांत पाणी साचलेले होते... खेळता खेळता या दोघांना खड्ड्यातील पाण्याची खोली लक्षात आली नाही आणि ते बुडाले... यावेळी कोणीही जवळपास नसल्याने त्यांना कुणाचीही मदत मिळू शकली नाही... सायंकाळी मुलांचे आई-वडील शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला... दरम्यान त्यांना खाली जागेत असलेल्या खड्ड्याजवळ दोघांच्याही चप्पल सापडल्या... एका तरुणाने खड्ड्याची खोली शोधली आणि तो दोघांचा शोध घेण्यासाठी खाली गेला... मुलांचे मृतदेह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आढळले...रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवला... पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post