मुंबई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील)
कांदळवन कक्ष मुंबई कांदळवन विभाग उत्तर कोकण वनपरिक्षेत्र ठाणे कांदळवन व कांदळवन सह व्यवस्थापन समिती सुरई सारंग यांच्या मार्फत २६ जुलै जागतिक कांदळवन दिवस निमित्त मौजे सारंग सुरई खाडी परिसरात स्वच्छता अभियानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तरी सदर कार्यक्रमात समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी उत्तम प्रतिसाद दिला व सुमारे साधारण १५० किलो कचरा गोळा करण्यात आला.... सदर स्वच्छता अभियानात कांदळवन सह व्यवस्थापन समिती यांचे अध्यक्ष श्री हनुमान पाटील सचिव तथा वनरक्षक श्री.प्रशांत प्रकाश वायाळ व सदस्य श्री मुकेश पाटील तसेच ग्रामपंचायत सरपंच व कांदळवन प्रतिष्ठान यांचे कर्मचारी उपस्थित होते...
