कोलाड क्रिकेट असोसिएशन सप्ताहचे यशस्वी आयोजन करण्यात आले..
कोलाड प्रतिनिधी: कोलाड क्रिकेट असोसिएशन चे कार्याध्यक्ष दानशूर व सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व यशस्वी मराठी ऊद्याजोक मा श्री प्रमोद शेठ म्हसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोलाड क्रीकेट असोसिएशन २४ गाव कमिटीच्या माध्यमातून व्रुक्षारोपण सप्ताहचे यशस्वी आयोजन करण्यात आले..
क्रीकेटच्या व्यतिरीक्त अनेक सामाजिक उपक्रम राबवणारी असोसिएशन म्हणून कोलाड क्रीकेट असोसिएशन ची ओळख आहे तरुणामधे पर्यावरणाविषयी प्रेम,आवड निर्माण व्हावी हा हेतु लक्षात घेऊन ही संकल्पना मांडलीय... आणि २४ गावातील क्रीकेट संघ व खेळाडूनी यात हीरीरेने सहभाग घेतला.. तर झाडे लावून त्यांचे वर्षभर संगोपन करण्याचा ही निर्धार व्यक्त केला..
प्रसंगी असोसिएशनचे कार्याध्यक्ष मा प्रमोदशेठ यानी ५०० झाडे ऊपलब्ध करुन प्रत्येक गावाला २० झाडांचे वाटप शुभंकर मँगो फार्म आणी नर्सरी संभे यांच्या माध्यमातून करण्यात आले.. तर कोलाड क्रीकेट असोसिएशनचे अध्यक्ष दर्शन मांडलुस्कर उपाध्यक्ष श्री संजय बामुगडे खजिनदार श्री मुरली बाईत सह खजिनदार श्री प्रशांत लोखंडे सेक्रेटरी श्री संदेश दळवी सह सेक्रेटरी श्री प्रथमेश खांडेकर व २४ गाव कोअर कमिटी व असोसिएशन मधील सर्व खेळांडुचे यासाठी मोलाच सहकार्य लाभले....



