महाराष्ट्र वेदभुमी

लॉजमध्ये ओळखपत्राशिवाय प्रवेश दिल्यास कारवाई

 

कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी 

पुणे- दि.२८ : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस अँक्शन मोडवर आले असून, शहरातील लॉज, हॉटेलमध्ये वास्तव्यास येणाऱ्या ग्राहकांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देऊ नये... ओळखपत्राशिवाय प्रवेश दिल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे...

आजमितीला शहरातील अनेक लॉज, हॉटेलमध्ये ओळखपत्राशिवाय ग्राहकांना प्रवेश देण्यात येतो... संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत... उपनगरातील कात्रज, हांडेवाडी, नन्हे परिसरात लॉज, हॉटेलची संख्या जास्त आहे... पुणे शहर, तसेच उपनगरातील सर्व लॉज, हॉटेल चालकांनी ग्राहकांकडून ओळखपत्र घ्यावे, तसेच ओळख पटवून, नाव नोंदवून त्यांना प्रवेश द्यावा, असे आवाहन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post