कोलाड (श्याम लोखंडे) "एक झाड पुढच्या पिढीसाठी " या सामाजिक संकल्पनेखाली सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड रोहा आणि वनविभाग, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवली तर्फे दिवाळी येथे सुदर्शन चे साईट हेड विवेक गर्ग व सी.एस.आर प्रमुख माधुरी सणस यांच्या विशेष संकल्पनेतून माजी आमदार अनिकेतभाई तटकरे, तसेच रोहा तालुक्याच्या वनविभागाचे आरएफओ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत वनसंवर्धन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला... तर सदर कार्यक्रमातून सुदर्शन च्या माध्यमातून पर्यावरणावरील भावनिक जबाबदारी, सामाजिक कर्तव्यनिष्ठा म्हणून पर्यावरण जोपासण्याचा संदेश देत पुढील पिढ्यांतर्गत वारशाचा संदेश प्रभावीपणे वृक्ष रोपणातून देण्यात आला...
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे | पक्षीही सुस्वरे आळवीती ॥ साधू संत महात्मे लिखित आहे की झाडांवर प्रेम करा त्यांचे प्रेम घ्या वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान.निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष हीच निसर्गाने मानवाला दिलेली खऱ्या अर्थाने देणगी आहे.त्याच धर्तीवर गेली अनेक वर्षे धाटाव औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन कारखान्याच्या वतीने पर्यावरणाची सामाजिक बांधिलकीतुन वृक्षारोपण करत असतात... या अनुषंगाने कोलाड परिसरातील चिंचवली येथे वृक्ष रोपण केले परंतु वृक्ष संपदा जोपासण्याची आजची गरज आहे... दरम्यान कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल कौतुक करताना या मार्गावरून जाताना कर्मचा-यांनी आपण लावलेल्या झाडांची योग्य ती जोपासना होत असल्याकडे, वाढ होत असल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिपादन सुदर्शनचे साईटहेड विवेक गर्ग यांनी करत सूचना दिल्या...यावेळी कंपनीतील स्टाफ,आणि कर्मचारी वृंद तसेच असंख्ये पर्यावरण प्रेमी उपस्थित होते...
रोहा तालुक्यातील तसेच औद्योगिक क्षेत्रातील जागतीक स्तरावर नावलौकिक असलेल्या सुदर्शन केमिकल्सच्या वतीने तसेच वनविभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमानाने रोहे तालुक्यातील चिंचवली येथे रायगड जिल्ह्याचे वन विभागाचे डीएफओ शैलेंद्र कुमार जाधव यांच्या सकारात्मक सहकार्याने एक हेक्टर जागा उपलब्ध करुन यामध्ये एक हजार भारतीय प्रजातीय रोपांचे वृक्षारोपण मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात करण्यात आले...
या उपक्रमाचा शुभारंभ माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला...
दरम्यान अनिकेत तटकरे यांनी यावेळी सांगितले की मुख्य उद्देश रोहा परिसरातील वनीकरणास चालना देणे, स्थानिक वनसंपत्तीचे संवर्धन करणे, औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संतुलन यात सुसंवाद साधणे आणि सर्व भागधारकांनी म्हणजेच सुदर्शन कंपनी, वनविभाग, स्थानिक प्रशासन, पर्यावरण तज्ञ या सर्वांनी एकत्र येऊन वृक्षसंवर्धनाबरोबरच जैवविविधता वाढवण्या करीता फुलपाखरांचे उद्यानासारखे ही प्रकल्प हाती घ्यावे अशी वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले..त्यांनी या प्रकल्पाला केवळ झाडे लावण्यापेक्षा अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहिले आहे...
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड च्या सी.एस.आर विभाग प्रमुख माधुरी सणस यांनी हा प्रकल्प केवळ मातीत नव्हे तर हृदयात रुजवण्याचा प्रयत्न आहे ! कारण पुढील दोन वर्षांत सुदर्शन केमिकल अंतर्गत या रोपांची योगय काळजी व यश्सवी संगोपण करण्यात येणार आहे... तसेच वनसंवर्धनाच्या संगोपनाच्या विस्तारला उपस्थित कर्मचारी वर्गाने प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले... पुढच्या पिढीसाठी हरित वारसा देणे, ही आमची कर्तव्यनिष्ठ शपथ आहे... तसेच यापुढेही वन विभागांच्या सहकार्यातून वन विभागाच्या आरक्षित जागांत वृक्षारोपण अभियान राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले व सुदर्शन केमिकलचा हा प्रयत्न रोह्यातील पर्यावरण प्रेमाचा भावनिक पाया व नाते रुजेल, अशी अपेक्षा व्यक्त केली...
तसेच रोहा तालुक्याच्या वनविभागाचे आरएफओ चौबे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सुदर्शन कंपनीच्या या प्रकल्पाला "पर्यावरण प्रेमाचा आदर्श" म्हणून गौरवले पाहिजे तसेच ते सामाजिक बांधिलकीतून वृक्ष रोपण आणि त्यांचे संवर्धन संगोपन करून पर्यावनातून एक चांगला संदेश देत आहेत...
तर सदरच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रविकांत दिघे यांनी केले... हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महेश देरिया, संजय कचरे, दिशांत ढाणे , अमर चांदणे, स्वाती पवार, पराग फुकणे , विक्रम वाबळे यांसह सुदर्शन कंपनीच्या कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आणि रोहा वनविगाचे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले...

