देवलापार येथे लाचलुचपत अधिकार्यांची कारवाई
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक : शेत जमिनीच्या वारसान चढविण्याच्या फेरफार कामासाठी पैशांची मागणी केली. तलाठ्याला दोन हजार रूपयाची लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई रामटेक तालुक्यातील देवलापार येथे मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली असून दिलीपकुमार रांचे (३०) रा. देवलापार असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो मौजा देवलापार येथेली तलाठी कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारदार धम्मपाल डोंगरे यांची वडिलोपार्जित शेत मौजा खिळकी देवलापार येथे आहे. वडिलांचा निधणानंतर धम्मपाल यांनी तलाठी कार्यालयात शेतीवर वारसान चढविण्यासाठी अर्ज दाखल केला होता... तलाठी दिलीपकुमार रांचे यांनी शेतीवर वारसान चढवून फेरफार करण्यासाठी धम्मपाल डोंगरे ला पैशाची (लाच) मागणी केली. एकूण दोन हजार रुपयांची मागणी केली होती... लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची खातरजमा केली आणि मंगळवारी सायंकाळी तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला... दिलीपकुमारने तक्रारकर्त्याकडून दोन हजार रुपये स्वीकारताच त्याला ताब्यात घेत अटक केली... ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक सागर कवडे, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम, उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया व विवेक पडघान, पोलिस नायक कांचन गुलबसे, सारंग बालपांडे, सचिन किन्हेकर, प्रिया नेवरे यांच्या पथकाने केली...
गुन्हा दाखल
देवलापार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती... या कारवाईबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकनर यांना माहिती देण्यात आली असून, दिलीपकुमारच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली...
