शिवसेना पक्ष मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न लावून धरत आहे. मागील आमसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या रस्त्याचे काम काही दिवसात सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र चार महिने उलटून गेल्यानंतरही हालचाल होत नव्हती. खड्ड्यांनी तसेच वाहतूककोंडीने होणारे जनतेचे हाल पाहता ढिम्म प्रशासनाला आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर म्हणाले. यावेळी तालुका संघटक बी एन डाकी उपतालुका संघटक रुपेश पाटील विभागप्रमुख भूषण ठाकूर अनंता पाटील वशेनी सरपंच अनामिका म्हात्रे, बांधपाडा माजी सरपंच शिवसेना महिला तालुका प्रमुख भावना म्हात्रे आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार यांना धारेवर धरत जाब विचारला. ठेकेदार राजशेठ खारपाटील यांनीही सर्वांना आश्वस्त करत हे काम लवकरच पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे व आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत असल्याचे सांगितले...
या आंदोलनाला माजी तालुका प्रमुख राजीव म्हात्रे, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, कोप्रोली शाखाप्रमुख रवी म्हात्रे, खोपटे शाखाप्रमुख नंदकुमार ठाकूर, रितेश ठाकूर, गणेश म्हात्रे, जयंत म्हात्रे, प्रांजल पाटील, लक्ष्मण ठाकूर, गजानन वशेणीकर दिपक म्हात्रे, गणेश वशेणीकर, महेश कोळी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी घोषणा देत निदर्शने करत काही काळ रास्ता रोको केला होता...
