पनवेल जितिन शेट्टी : होपमिरर फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘गोल्डन ह्यूमनिटी अवॉर्ड २०२५’ हा भव्य पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला... या समारंभात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला...
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती... त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी शिवसेना नेते संजोग वाघेरे पाटील, शेकाप नेते बाळाराम पाटील, राष्ट्रवादी नेते सुहास देसाई, सतीश पाटील, सुरेश बने, रविंद्र चव्हाण, गोपाल पाटील, प्रमोद (आप्पा) पाटील आणि अब्दुल माजीद यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली...
होपमिरर फाउंडेशनचे संस्थापक रमझान शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.., “गोल्डन ह्यूमनिटी अवॉर्ड हा केवळ एक पुरस्कार सोहळा नसून, समाजात माणुसकी जपणाऱ्या खऱ्या हिरोंना पुढे आणण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे... डॉ. जितेंद्र आव्हाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली आहे...”
हा सोहळा सामाजिक एकता, प्रेरणा आणि माणुसकीच्या मूल्यांचा संदेश घेऊन यशस्वीपणे संपन्न झाला... होपमिरर फाउंडेशनच्या पुढील उपक्रमांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
