अलंकार कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
बेलपाडा -: दि.२७ : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका संघटक अलंकार कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची संवाद बैठक पनवेल तालुक्यातील बेलपाडा येथे संपन्न झाली... आणि अलंकार कडू (रा. रांजणपाडा) यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला...
यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थापक/अध्यक्ष मा. श्री. विजय सूर्यवंशी साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब अडांगळे, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव श्री प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष मा. धनाजी पुदाले, सचिव मा. राजपाल शेगोकार, कार्याध्यक्ष.सचिन गायकवाड, उरण तालुका अध्यक्ष मा. कांतीलाल पाटील, उरण तालुका कार्यध्यक्ष प्रविण नाईक, रायगड जिल्हा अन्याय अत्याचार निवारण समितीचे अध्यक्ष सौ. अश्विनी ठाकूर तसेच रायगड जिल्ह्यातील पत्रकार व पदाधिकारी व ठाण्यातील पत्रकार व पदाधिकारी व मुंबईचे पत्रकार व पदाधिकारी महिला उपस्थित होते...
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका संघटक अलंकार कडू (रा. रांजणपाडा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
