महाराष्ट्र वेदभुमी

गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे ' एक झाड आईच्या नावे '


नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांची प्रमुख उपस्थिती

ग्रामस्थ व वनवासी महिलांनी काढली मिरवणूक

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- आदिवासी भागातील गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे "एक झाड आईच्या नावे " हा कार्यक्रम नुकताच मंगळवार (दि.२२) जुलै रोजी  घेण्यात आला. याप्रसंगी गौतीर्थ परिसरात सीएसआयआर नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांचेसह येथील तब्बल ३१ वैज्ञानिकांची प्रमुख उपस्थिती होती... कार्यक्रमाची सुरुवात एका प्रतीकात्मक वृक्ष दिंडी ने झाली, ज्यामध्ये गावातील ग्रामीण व वनवासी महिलांनी आपल्या डोक्यावर झाडांच्या रोपांची मिरवणूक केली... दिंडीच्या अगदी पुढे गोंड जमातीचे पारंपरिक वाद्य वाजवणारे कलाकार होते, त्यांच्यामागे सजवलेल्या गोमातेवर छत्र धरून चालणारे व्यक्ती, त्यांच्यानंतर झाडांच्या रोपांसह महिलांचा समूह होता... मिरवणुकीत निरीचे संचालक डाँ. एस व्यंकट मोहन व अन्य ३१ वैज्ञानिक सहभागी होते... दिंडी मुख्य प्रवेशद्वारापासून श्याम भवनापर्यंत होती...परिसरात सर्व वैज्ञानिकांनी औषधी वनस्पतींची लागवड अतिशय उत्साह व आत्मीयतेने केली... प्रत्येक झाडाच्या फलकावर त्या झाडाचे रोपण करणाऱ्या व्यक्तीच्या मातोश्रींचं नाव, स्वतःचं नाव, तारीख व त्यांच्या संस्थेचे चिन्ह अंकित करण्यात आले होते, जेणेकरून ह्या प्रसंगाची आठवण कायम राहील...

श्याम भवन सभागृहात दीपप्रज्वलनानंतर सर्व मान्यवर व वैज्ञानिकांचा सत्कार गोविज्ञान संशोधन समिति सदस्य यांनी केला... कार्यकारी अध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांनी प्रस्तावना सादर करताना गोविज्ञान अनुसंधान केंद्र व नीरी यांच्यातील गेल्या २५ वर्षांच्या सहकार्यपूर्ण संशोधन व शैक्षणिक संबंधांची माहिती दिली... नीरीचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. रितेश विजय यांनी सर्व नीरी वैज्ञानिकांच्या वतीने "एक झाड आईच्या नावे" या भावनिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल गोविज्ञान केंद्राचे आभार मानले... सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांनी अध्यक्षीय भाषण करताना, गोविज्ञान केंद्राचे अध्यक्ष श्री. पदमेश गुप्ता यांच्या अभिनव संकल्पनेचे व सादरीकरणाचे कौतुक केले... डॉ. संजय एकापुरे यांनी गोविज्ञान केंद्रात माफ़सूच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविल्या जाणाऱ्या आयव्हीएफ-इटीटी प्रकल्पाची माहिती उपस्थित वैज्ञानिकांना दिली, जो की देशी गाईंच्या संरक्षण - संवर्धनासाठी उपयुक्त आहे... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री. संतकुमार गुप्ता यांनी केले. आभार प्रदर्शन संशोधन समितीचे सदस्य डॉ. संजय वाते यांनी केले... गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे कार्यकारी सदस्य वैद्य नंदिनी भोजराज, वैद्य श्यामला रेखडे, डॉ. संजय वाते, श्री. सुनील मेहाडिया व श्री. सतीश मोहोड़ उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post