महाराष्ट्र वेदभुमी

खांब येथे घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान.

 


कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तसेच मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या खांब येथील काही घरात सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी धो धो कोसळलेल्या मुसळधार पावसाने केलेल्या अतिवृतीमुळे घरात पाणी शिरल्याने येथील घर मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे...

गेली पंधरा वर्षाहून अधिक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी कारणाच्या कामाची दिरंगाई तसेच त्यासाठी जागोजागी सदरील ठेकेदारांनी केलेली खोदाई अथवा भराव त्याचबरोबर काही गटारे आणि मोऱ्यांची सोडलेली अर्धवट कामांमुळे येथील गटारे कालव्याचा पाणी तुडूंब भरल्याने येथील ग्रामस्थ नागरीकांना अखेर मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिला सामोरे जावे लागले त्यामुळे येथील ग्रामस्थ नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे...

सोमवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली असुन रात्रभन रिपरिप पाऊस पडत असताना मंगळवारी मात्र पहाटेपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे डोंगर माथ्यावरील नाले मुसळधार होत असलेल्या पावसामुळे भरून वाहिले तर ते पाणी कालव्यातून उलटून खांब परिसरात मार्गावर रस्त्यावर पाणी आले तर महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे हे पुराचे पाणी येथील लोकवस्तीत नरेंद्र जाधव, महादेव सानप, समीर म्हात्रे, दत्ता चितळकर आदी ग्रामस्थांच्या घरात शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू तसेच लाकडी फर्निचर व काही किंमती वस्तूंचे मोठे नुकसान झाले असल्याने येथील नागरिकांच्यात एकच संतापाची लाट उसळली आहे तर सदरील प्रशासनाने याची दखल घेत नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post