महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस, खांब देवकान्हे मार्गावर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ, शाळांना बंदची हाक.

कोलाड (श्याम लोखंडे) गेली आठ ते दहा दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर रोहा तालुक्यात पुन्हा मेघराजा बरसला सर्वत्र पाणीच पाणी तर सोमवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खांब देवकान्हे परिसरात भातशेतीत पूरपरिस्थिती निर्माण झाली तर डोंगर भागातील नाले ओसंडून वाहिल्याने तसेच कुंडलिका नदीचा उजवा तीर कळवा तुडूंब भरून पलटी झाल्याने येथील मार्गावर पाणीच पाणी साचले तर मार्ग क्रमण करण्याची नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली तर काही वाहने बंद पडल्याची घटना घडली तर काही कामगार पुन्हा माघारी घरी परतले असे समजते त्याच बरोबर मुसळधार पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शाळांना बंदची हाक देण्यात आली आहे... 

गेली आठ ते दहा दिवसांपासून रायगड जिल्ह्यात उकाढा वाढल्यानंतर रविवारी रात्री पासून पाऊस बरसला, बळीराजा भात लावणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत होता. त्याच्या आगमनाने तो सुखावला आहे. जिल्ह्यात पुढील सहा दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच सोमवारी रात्री जोरदार वरुणराजा बरसल्याने मंगळवारी अनेक ठिकठिकाणी पूरपरिस्थि निर्माण होत खांब देवकान्हे परिसरात तसेच खांब पालदाड ठिकाणच्या मार्गांवर पाणी साचल्याने मार्ग क्रमण करण्यासाठी कामगार, शाळेतील विद्यार्थी, पादचारी, दुचाकीस्वार तसेच काही वाहन चालकाना मोठी तारेवरची कसरत करावी लागली तर अधिक होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच हवामानखात्याने दिलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शाळा, महाविद्यालय बंद हाक देत सुट्टी जाहीर करताच शाळकरी विद्यार्थी सुखरूप घरी परतले...

मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वाढलेल्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते... रविवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने रायगडकरांना दिलासा मिळाला असून, शेतीच्या कामांनाही वेग आला आहे... मात्र सोमवारी त्यात अधिक वाढ झाल्याने वरुणराजाने आकाशात काळ्या ढगांची गर्दी करत सोमवारी बरसल्याने मंगळवारी पुन्हा दिवसर शेतीत पाणी साचल्याने कामे खोळंबल्याची पहावयास मिळाली...

Post a Comment

Previous Post Next Post