महाराष्ट्र वेदभुमी

डायलेसिस रुग्णासाठी ठरणार वरदान : राज्यमंत्री जयस्वाल

उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे डायलेसिस सेंटर उदघाटन 

प्रतिनिधी : सचिन चौरसिया 

रामटेक:-  उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे डायलेसिस सेंटरचे उद्घाटन रविवार (दि13) ला नामदार आशिष जयस्वाल साहेब राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे शुभ हस्ते करण्यात आले... राज्यमंत्री आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले " रामटेक उपजिल्हा रुग्णालयात अनेक आजारांच्या रुग्णांसाठी आपण दिवसेंदिवस प्रयत्न करू, आज डायलेसिस सेंटर सुरू झाले असून याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा... सदर डायलेसिस सेंटर शासनाच्या वतीने एचएलएल कंपनी मार्फत मोफत रुग्णसेवा देणार आहे... डायलेसिस सेंटर मध्ये एकुण ७ मशिन कार्यान्वीत करण्यात आलेल्या असुन तालुक्यातील किडणी आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना डायलेसिसची सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे... रुग्णांना आता डायलेसिस करीता नागपूर तसेच इतर खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही... रुग्णांना तालुका स्तरावर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्यामुळे रुग्णांना नाहक होणारा त्रास होणार नाही.याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाघमारे यांनी यावेळी दिली. डायलेसिस सेंटर उद्घाटन प्रसंगी रुग्णालयातील डॉ. संजय वाघमारे वैद्यकीय अधिक्षक, डॉ. शुभम जैस्वाल वैद्यकीय अधिकारी, डॉ. सबाहत खान दंतशल्यचिकित्सक, अर्चना मडावी परिसेविका, कांदीबीनी तिरपुडे परिसेविका, असुफा अंसारी ईनचार्ज डायलेसिस सेंटर, शितल सोनवने डायलेसिस अधिपरिचारीका, नयन पाटील डायलेसिस टेक्निशन व उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथील कार्यरत अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post