मेन चौकात पाणी साचल्याने प्रवाश्यांची कसरत, जबादार कोण? शाळा बंद..
कोलाड (श्याम लोखंडे) मुंबई गोवा महामार्गावर असलेले कोलाड आंबेवाडी नाक्यावर बाजापेठ तसेच सर्व्हिस रोड हद्दीत पाणीच पाणी,
अक्षरशः ढगफुटी त्यामुळे काही वस्तीत तसेच दुकानात पाणी शिरले आंबेवाडी वरसगाव डोंगर माथ्यावरून नाल्यातून पाण्याचा लोंढा आल्याने तसेच कुंडलिकेचा डावा तीर कालवा ओहळ पलटून आले त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर अर्धवट सुरू असलेल्या गटार लाईन सर्व्हिस रोड त्याच बरोबर मेन चौकातील उड्डाण पूल यांची सुरू असलेल्या अर्धवट कामांमुळे भरपूर पाणी साचले त्यामुळे काही मार्गावर पाणी आले तर काहींच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे खूप नुकसान झाले असल्याने प्रशासनाने त्यांचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी केली जात आहे.तर वरुणराजाच्या अधिक अतिवृष्टीमुळे तसेच हवामान खात्याच्या रेड अलर्ट अंदाजामुळे जिल्हा अधिकारी यांनी तातडीने बंद ची हाक पुकारत तसेच निर्देश देत शाळा, माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती...
मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे कोलाड आंबेवाडी बाजारपेठत पुराचे पाणी शिरले तर कोलाड आंबेवाडी नाक्यावरील द. ग.तटकरे चौकात रोहा मार्गावर भरपूर पाणी साचल्याने ये जा करणारे प्रवासी नागरिक तसेच दुचाकी स्वरांसह काही वाहन चालकाना येथून वाहने मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि चौकातील सुरू असलेला उड्डाण पुलांचे आणि गटार लाईनच्या अर्धवट कामांमुळे कधी नव्हे ती पूरपरिस्थि निर्माण झाल्याने एकच संतापाची लाट उसळली असून याला जबाबदार कोण असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे.तर ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि कामांची दिरंगाईमुळे कोलाड आंबेवाडी नाक्यावर काही ठिकाणी पाणी साचले तर आंबेवाडी मार्गावरील दुकानांतून पाणी शिरल्याचे दिसत असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे...
रोहा तालुक्यात गेली आठ ते दहा दिवसांची मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर रविवारी पावसाने हजेरी लावली तर सोमवारी अधिक जोर धरत संध्याकाळ पासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र असताना, आज मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे ये परिसरातील डोंगरदऱ्यातील नाले आणि नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. आज सकाळी पावसाचा जोर वाढल्याने येथील गोदी नदी कालवा पुर आला असुन, या पुराचे पाणी या परिसरात साचले तसेच ते पाणी कोलाड आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठेतील सर्व्हिस मार्गावर साचून राहीले तसेच कोलाड रोहा मार्गावरील मेन चौकात तर अक्षरशः प्रवाशांची तारांबळ तसेच त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती...
दरम्यान, जिल्हा अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व प्रशासनाचा सुट्टीसंदेश सकाळी साडेनऊच्या सुमारास शैक्षणिक संस्थांना मिळाला. तोपर्यंत अनेक विद्यार्थी शाळा गाठण्यासाठी घरातून निघाले होते. काही विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसात शाळेपर्यंत प्रवासही केला होता. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापनांची मोठी तारांबळ उडाली. पालकांनी ही सुट्टी पूर्वसूचना स्वरुपात शाळा सुरु होण्याआधी देण्यात यायला हवी होती, अशी नाराजी विविध स्तरावरून व्यक्त केली जात होती...
प्रतिक्रिया
मुंबई गोवा महामार्गाच्या कामात ठेकेदाराची मोठी दिरंगाई गेली अनेक वर्ष चौपदरी करणाचे काम रखडले अर्धवट सोडून ठेवले गेलेले सर्व्हिस रोड, गटारे उड्डाण पुलासाठी करण्यात आलेला भराव तसेच बांधण्यात आलेले निकृष्ट दर्जाची गटारे काही ठिकाणी त्यांचे स्लॅब कोसळून ते गटार लाईन मध्ये पडलेत याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे तसेच येथील ठेकेदार हा त्याच्या मनमानीनुसार तसेच हुकूमत गाजवत काम करत असल्याचे दिसून येत आहे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील बाजारपेठ मार्गावर तसेच कोलाड रोहा मार्गावरील द ग तटकरे चौकात पूरपरिस्थिती निर्माण होत काही दुकानांतून पाणी शिरल्याने व्यावसायिक दुकानदारांचे नुकसान झाले असून याची दखल सदरील प्रशासनानी घेऊन त्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे यांनी केली आहे...
