महाराष्ट्र वेदभुमी

गोमांस विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक;देवलापार पोलीसांची कारवाई

रामूने वासरू आणला अनिल ने कत्तल केला व सोनू हे विक्री केला

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- गोवंश हत्या व गो तस्करी करण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे... गोहत्या करणे कायद्याने गुन्हा असला तरी ज्या गाईचा गोशाळा मुळे घरदार चालत होते त्याचं गोशाळेतील वासराची कत्तल करून गोमास विक्री कारणांऱ्या तीन आरोपीला अटक करण्यात आली आहे... प्रबंधकला व गौशाळेतील लोकांना विश्वासच बसत नव्हता. अनिल वासुदेव वरठी ( ३२) रामू युवराज ठाकरे (३२), सोनू निर्मलदास सारवा (२४) तिन्ही राहणारे न्यू तोतलाडोह (रयतवाडी ) ता. रामटेक अशी आरोपीची आहेत... अनिल आणि रामू हे दोघेही गो विज्ञान केंद्र देवलापार येथे गोशाळातील गाई चराईच्या काम करत होते... गेल्या पाच ते सहा वर्षापासून ते गोशाळेत काम करत होते... त्यांनीच वासराची कत्तल करून त्याचे मास गावात विकले... गो शाळेतील कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती भेटली असता त्यांनी ती  देवलापार पोलीस स्टेशन येथे कळवली... ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी आपल्या पोलीस पथक व  गौशाळेची टीम यांनी अनिलच्या घरी जाऊन धाड मारली असता त्या ठिकाणी १५ किलो वजनाचे मास एकसत्तूर आणि एक सूरी अवजारे घटना स्थळ वरून जप्त करण्यात आले... अनिल त्या ठिकाणाहून पळ काढला... पोलिसांनी अनिल, रामू व सोनू यांना ताब्यात घेण्यात आले... गौशाळेतील चारायला घेऊन गेलेल्या गाई व वासरांपैकी एक वासरू (छोटा नंदी) कत्तल करून गोमास विक्री केल्याच्या पोलिसांसमोर  तिघांनी स्वीकृत केले... देवलापार पोलिसांनी तीनही आरोपी विरुद्ध कलम ५(क), ९(अ) ९ (ब) महा.पशु संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ३२५, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली असून न्यायालयाने तिन्ही आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली...

Post a Comment

Previous Post Next Post