प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक:- तालुक्यातील करवाई ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मानेगावटेक येथे एका दारूच्या नशेत असणाऱ्या शेजाऱ्यांने ६५ वर्षीय महिलेला अमानुष मारहाण करत महिलेचे हात-पाय मुरगळून मोडण्यात आले... त्यात ती गंभीर जखमी झाली... परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला... कमला हिरामण वरकडे (६५) असे मृत महिलेचे नाव आहे... दारुड्या आरोपीचे नाव संजीव मन्साराम भलावी (३५) आहे...
कमला वरकडे ह्या घरी एकट्याच राहात होत्या... आरोपी संजीव मंसाराम भलावी हा ट्रकवर क्लिनरचे काम करायचा.. त्याला दारूचे व्यसन असून तो अधूम मधून घरी यायचा.. शनिवार (दि.१२) ला रात्री संजीव कमला यांचे घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने गेला... तो त्या दिवशीही दारुच्या नशेतच होता... कमला यांनी पिण्याच पाणी दिल्यानंतर कोणत्यातरी कारणावरून वादघालून संजीवने कमला यांना मारहाण सुरु केली... मारहानीत संजीवकडून कमला यांचे हात व पाय मुरगळून मोडण्यात आले... कमला विनवणी करू लागली... पण दारोड्या संजीवने काहीही एकले नाही... मारल्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला... रात्रभर कमला तडफडत राहील्या... सकाळी त्या घराबाहेर न आल्याने शेजारच्यांनी पाहिले असता त्या गंभीर अवस्थेत दिसुन आल्याने यांची माहिती पोलीस पाटील गजानंद मडावी यांना देण्यात आली... त्यांनी त्वरीत ही माहिती देवलापार पोलीसांना दिली... देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले... कमला यांनी संजीव याने मारल्याचे सांगीतले... कमाला यांना देवलापार येथे ग्रामिण रुग्नालयात दाखल करण्यात आले... उपचारादरम्यान कमला यांचा मृत्यु झालाय... पोलीसांनी आरोपी संजीव याच्यावर १०२ (१), ३३३ भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला... महिलेचो प्रेत उत्तरीय तपासणी करीता नागपूरला पाठविण्यात आले... आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहे...
