महाराष्ट्र वेदभुमी

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन

आदिवासी विकासासाठी बोरडा गावात विशेष शिबीर : ७९ लोकांनी घेतला लाभ 

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत रामटेक तालुक्यातील बोरडा येथील गटग्रामपंचायत लाभवाटप शिबिराचे आयोजन सोमवार (दि.१४) ला उत्साहात पार पडले. धरती आबा अभियान' अंतर्गत जनजागृती मोहीम तसेच 'धरती आबा कर्मयोगी' या क्षमता विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी गावपातळीवर केली जाते. यामुळे बहु-क्षेत्रीय सेवा थेट लाभार्थ्यांच्या दारात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमांत वेगवेगळ्या विभागा मार्फत उत्पन्न दाखला, सात-बारा, नकाशा वाटप करणे, आधारकार्ड, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र, पीएम-किसान, अमृत आहार, पूरक पोषण आहार, संजय गांधी, श्रावण बाळ योजना आदी वैयक्तिक लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी गावस्तरीय व क्लस्टरस्तरीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आधार केंद्र कडून आधार अपडेटेशन करण्यात आले. यावेळी एकूण ७९ लोकांनी या सर्व योजनांचा लाभ घेतला. उपविभागीय अधिकारी प्रियेष महाजन तसेच तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनात राजू लोणकर (मंडळ अधिकारी पवनी),अनुजा नवनागे (ग्राम महसूल अधिकारी,खुमारी), पी.एन.चव्हाण (ग्रामविकास अधिकारी) यांच्यासह तहसील कार्यालयाचे इतर सर्व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले...

Post a Comment

Previous Post Next Post