ग्रा. पं. सदस्य मोहित ईखार यांच्या पत्रपरिषदेत आरोप..
रामटेक :- तालुक्यातील ग्रामपंचायत नगरधन अंतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे नालीचे बांधकाम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराकडून आपल्याच जेसीबीने त्या बांधकामात चक्क नाल्याच्या जवळील माती अवैधरित्या उत्खनन करून नालीच्या बांधकामास वापरण्यात येत आहे... असा आरोप ग्रामपंचायत सदस्य मोहित ईखार यांनी पत्रपरिषदेत केला आहे...
ग्रामपंचायत नगरधन येथील वॉर्ड क्रं. २ इंदिरानगर टोली येथे सुरेश चाके ते सिकंदर दमाहे यांचे घरापर्यंत १५ लक्ष रुपयाचे नालीचे बांधकाम सुरू असुन ती कामे ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे स्वतः करीत आहे... त्यानी रविवार (दि.२७) ला दुपारी १२ वाजता जेसीबी क्र. एमएच ४०-सीक्यु-८७२५ स्वतः चालकासोबत घेऊन हिवरा रोड कवलापूर जवळ असलेल्या नाल्याच्या बाजूची अवैधरित्या जेसीबीद्वारे माती काढून ती माती सुरू असलेल्या नालीच्या बांधकामात वापरण्यात आली... जेसीबीने अवैध उत्खनन करताना दिसताच धावत तिथे जाऊन हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल मध्ये शूट करण्याच्या प्रयत्न केला परंतु जेसीबी व ट्रॅक्टर चालक आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे यांनी तिथून पळ काढला. या रोडवरून नेहमी शाळकरी विद्यार्थी तसेच गावकऱ्यांचे येणे जाणे असल्याने झालेले अवैध उत्खननामुळे रोड फुटून जवळील नाल्याचा पुलाला पण धोका असून जीवितहानी पन होऊ शकते त्यामुळे मातीचे अवैध उत्खनन करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व कंत्राटदार सचिन दशहरे यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून कार्यवाही करावी. अशी मागनी ग्रामपंचायत सदस्य मोहित ईखार यांनी केली आहे...
मातीच्या उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना सुद्धा नाल्याच्या बाजूची माती अवैधरित्या उत्खन करुन सर्रासपणे नालीच्या कामासाठी वापरण्यात आलेली आहे... शिवाय मातीचा अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूलही बुडतो, कारण या कामांसाठी कोणतीही परवानगी घेतली नाही... याप्रकरणी उपविभागीय अधिकारी रामटेक, तहसीलदार रामटेक व गटविकास अधिकारी पं.स. रामटेक यांना तक्रार करण्यात आलेली आहे... करिता या उत्खननासाठी वापरलेल्या जेसीबी व ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन संबंधित ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा... मोहित ईखार ग्रा.पं. सदस्य नगरधन
