प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेकः निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन पत संस्थेचे अध्यक्ष वामनराव नायगावकर यांनी केले...
सिंधूरागिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रामटेक द्वारा सामाजिक बांधीलकीतून सोमवार (दि.२८) मनसर-रामटेक महामार्ग स्थित बायपास रोडवर वृक्षारोपन करण्यात आले... यावेळी संस्थेचे अध्यक्ष वामनराव नायगावकर, मनोहर वांढरे, राहुल जोहरे, श्रीधर धुळे, व्यवस्थापक विशाल कावळे, जितेंद्र खंडाळ सहित कर्मचारी उपस्थित होते...
