मुंबई प्रतिनिधी : (सतिश.वि.पाटील)
विरार -: अलिबाग कॉरीडॉर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी संघटना लढत आहे... अंजूर दिवे, अंजूर, आलीमघर गावात २५० एकर च्या आसपास भूदान जमीन आहे... ही जमिन सावकाराने भूदान चळवळ समितीला दान देण्याअगोदर १९५७ पासून शेतकरी कुळ आहेत...कुलकायद्या नुसार संबंधित जमिनीचे शेतकरी मालक आहेत... पूर्वी पासून भीती दाखवून , फसवून, राजकीय डावपेच आखून शेतकऱ्यांना गंडवण्यात आलं आहे... भूदान समिती शेतकऱ्या कडून ४० % मोबदला मागत आहे... त्यास प्रखर विरोध करून शेतकऱ्यांना १०० % मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघटना कायदेशीर लढत आहे... भूदान समितीला मोबदला वर्ग करू नये म्हणून प्रांत अधिकारी श्री.अमित सानप साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे... सोबत तहसीलदार श्री.अभिजीत खोले साहेब ही आहेत...
शेतकरी बांधवांना विनंती वजा सूचना आहे की कोणाच्या दबावाला बळी न पडता, न घाबरता, भुलथापांना बळी न पडता न्याय मिळत नाही, १००% मोबदला मिळत नाही तो पर्यंत लढायच आहे... यश नक्कीच मिळणार आहे...
