"प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नारळ फोडून लोकार्पण"
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
पनवेल- दि . : महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक, परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरू आहे...
त्याचाच एक अध्याय म्हणून पनवेलचे आमदार श्री.प्रशांतजी ठाकूर आमदार श्री.विक्रांतजी पाटील यांच्या पाठपुराव्याने "सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक प्रवासा करीत पनवेलला मिळाल्या नवीन बसेस... लोकांच्या सेवेसाठी वाहतुकीतली नवी पायरी प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल आज पडले... पनवेलला मिळाल्या अत्याधुनिक बसेस ज्यामध्ये आवश्यकता प्रवाशांसाठी सुख सोयी उपलब्ध आहेत.."
आज पनवेल एस.टी. बस स्थानक येथे नवीन बसेसचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते श्री प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले... यावेळी मा. नगरसेवक श्री.गणेशजी कडू, मा. नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज, मा.नगरसेविका सौ.सारिका भगत,परिवहन विभागीय वाहतूक अधिकारी श्री अमित गिरमे, वाहतूक अधिकारी श्री ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेल आगार व्यवस्थापक सौ अश्विनी फाळके, श्री संजय पाटील आणि आजारातील विभागीय कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते...
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले, सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक प्रवासा करीत पनवेल बस आगारात नवीन बसेस दाखल झाल्या आहेत... त्याचा नागरिकांना भविष्यात उपभोग घेता येईल... पनवेल बस आगार नव्याने निर्मितीसाठी काही त्रुटी निर्माण झाल्यामुळे काम थांबले आहे... संबंधित विभागाशी योग्य तो पाठपुरावा करून लवकरच प्रवाशांना आगारामध्ये मिळणाऱ्या सुख सुविधा त्यांना उपभोगता येतील यासाठी आम्ही पाठपुरावा घेणार आहोत...
