माणगाव :- (प्रतिनिधी) : तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रातील ट्युबक्राफ्ट कंपनीमधून लाखो रुपयांच्या मशीनची चोरी करणाऱ्या टोळीस माणगाव पोलीसांनी अटक केली आहे... पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी फिर्यादी यांच्या कंपनीचे शटर तोडुन कंपनीमध्ये प्रवेश करून सुमारे ३३१०००० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरटयानी चोरी केला होता... या गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपीत यांचा शोध घेणेकामी अधिकारी व अमंलदार तपास पथक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तांत्रिक कौशल्य व वैद्यानिक तपासाच्या आधारे गुन्हयातील मुद्देमाल व अज्ञात आरोपीबाबत माहीती घेतली असता ट्युबक्राफ्ट प्रोसीजन प्रायव्हेट लिमीटेड ही कंपनीत चोरी करणा-या आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली... गुन्हयातील आरोपी नावे मंगेश रविंद्र पवार वय-२५ रा. पाथरशेत आदिवासी, ता. रोहा जि. रायगड यास अटक करण्यात आली... आरोपीत यांचेकडे सखोल विचारपुस करून इतर आरोपीत व त्याचे साथीदार विकास दत्ता पवार रा. दिघेवाडी, पो. नांदगांव, ता. सुधागड, जि. रायगड, समिर भिम पवार, रा.मु.काजुवाडी, पो.नांदगांव, ता. सुधागड, जि. रायगड, दिनेश उर्फ बबलू बबन घोगरेकर मु. पाथरशेत आदिवासीवाडी, पो. जामगांव, ता.रोहा, जि. रायगड, आकाश हरीश्चंद्र पवार मु. पाथरशेत आदिवासीवाडी, पो. जामगांव, ता.रोहा, जि.रायगड, चंद्रकांत इक्का जाधव वय-३५ वर्ष रा. पाथरशेत आदीवासीवाडी ता माणगाव जि. रायगड यांनी संगणमत करून माहे डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी-२०२५ अशी सलग तीन महीने सदर कंपनीचे शटर उचकटुन कंपनीमध्ये घुसुन कंपनीतील मशनरीची तोडफोड करून कंपनीतील महागडे कॉपर वायर, अल्युमिनीयम वायर, डाय, वेल्डींग मशीन, ट्युलींग मशीन इ. साहीत्य चोरी केले... याबाबत पोलीस स्टेशनची दोन पोलीस पथके तयार करुन रोहा, कोलाड, पाली, महाड परीसरात गुन्हा करणा-या सर्व आरोपीतांचा शिताफीने शोध घेवुन गुन्ह्यातील ५ आरोपी यांना दिनांक २३ जुलै रोजी अटक करण्यात आली... या गुन्ह्यातील एकुण ३७९००००/- रूपये किमतीचा मुद्देमाल माणगाव पोलिसांनी हस्तगत केला आहे... सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रायगड आँचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक रायगड अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव विभाग पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे , सपोनि भैरु जाधव, सपोनि बेलदार, पो.उप. निरीक्षक सुरेश घुगे, पोहवा फडताडे, पोहवा घोडके, पोशी शिर्के, पोशी मुंडे, पोशी दहिफळे, पोशी पवार सर्व माणगांव पोलीस ठाणे यांनी केली...
