अलिबाग (ओमकार नागावकर) : पेणहून अलिबागकडे येणारी एसटी बस सोमवारी (दि. २८) सकाळी भीषण अपघाताच्या उंबरठ्यावर येऊन थांबली. कार्लेखिंड उतारावर आल्यानंतर अचानक बसचे ब्रेक फेल झाले... धोका ओळखत, चालकाने प्रसंगावधान राखून बस डाव्या बाजूला वळवली आणि थेट सागावमधील बंद घरावर नेली... या शौर्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.., मात्र घराचे मोठे नुकसान झाले...
पनवेलहून सुटलेली ही बस अलिबाग एसटी आगारातील होती... उतारावर बस अनियंत्रित होण्याची शक्यता दिसताच, चालकाने सागावजवळ चढणावर वाहन वळवले... मात्र, समोर असलेल्या थळे यांच्या बंद घराला बसने जोरदार धडक दिली... या अपघातात घराची भिंत कोसळली असून प्रचंड नुकसान झाले...
प्रवाशांना इजा न झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी स्थानिकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एसटी प्रशासनाने तपास सुरू केला आहे...
