प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक:- मतदार संघातील गावातील अनेक सुरळीत सुरू असलेल्या बस गेल्या महिन्यापासून काही बंद तर काही वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे... परंतु या गावात परिवहन महामंडळाची खंडाळा 'बससेवा' बंद केल्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची शालेय शिक्षणाच्या प्रवासासाठी मोठे हाल होत आहे... त्यामुळे साहेब, आम्हाला शालेय शिक्षणासाठी थेट गावात पुन्हा खंडाळा-चाचेर 'बससेवा' सुरू करावी, अशी आर्त हाक खंडाळा येथील विद्यार्थिनींनी दिली आहे... बस सेवा बंद केल्यामुळे विद्यार्थी शाळेत, महाविद्यालयात वेळेवर पोहचत नाही... त्यामुळे विद्यार्थ्यांच चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे... त्या करिता खंडाळा-चाचेर मार्ग पुन्हा बससेवा सुरळीत चालू करण्याकरिता बिकेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शना खाली आगार व्यवस्थापक रामटेक यांना निवेदन देण्यात आले... यावेळी शिवसेना युवासेना शहरप्रमुख सौरभ सिंगनजुडे उपशहरप्रमुख विश्वास पाटील, उपशहरप्रमुख राहुल गुंडरे, राजा कामळे, विनोद पडोळे, अभय कारमोरे, आयुष कारमोरे, हितेश सावरकर, हर्ष कनोजे, आकाश चकोले हे उपस्थित होते...
