महाराष्ट्र वेदभुमी

धक्कादायक : विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या



प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक : एका पानटपरी चालकांनी विषारी औषध प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्यांतर्गतच्या नगरधन गावातली येथील बुधवार (दि.१६) चे पहाटे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पवन गजानन नागरिकर (२६, रा.नगरधन, रामटेक) असे मृत तरुणाचे नाव असून, हा नगरधन किल्ला रोडलगत पानटपरी चालवण्याचे काम करीत हाेता. तो मंगळवारी(दि.१५) सायंकाळी ७ चा सुमारास तो आपल्या घरी आला. घरी कुणीही नसताना गव्हात कीड न लागण्याकरिता वापरले जाणारे किटनाशक प्राशन केले. काही वेळात त्याला चक्कर येऊ लागले. प्रकृती बिघळत असल्यामुळे त्यांनी घराजवळील रहवासी शिवशंकर गायकवाड यांना  विषप्राशन केल्याचे सांगितले... त्वरित त्यांनी कुटुंबाला माहिती देऊन एका मित्रांसोबत त्याला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे हलविले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्रथमोपचारनंतर त्वरित त्याला नागपूर मेडिकल कॉलेज येथे भरती आले. तिथे बुधवार पहाटे २.०० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला... याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची केली असून  घटनेचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post