प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक:- चाचेर येथील एका शेतकऱ्याच्या झोपडीत ४ ते ५ फूट लांबीचा नाग जातीचा विषारी नर व मादी साप आढळून आले सोबत त्यांच्या २० ते २१ पिल्लांना रामटेक वनविभागाच्या कार्यालयात आणून पंचनामा करून सर्प मित्रांनी जंगलात सोडून जीवनदान दिले...
रामटेक तालुक्यातील चाचेर गावातील नितेश ठोसरे शेतात काम करीत असता झोपडीत औषधीचा बोऱ्या उचलत असताना त्यांना तिथे एक विषारी साप आढळून आला... त्यांनी लगेच ही माहिती सर्पमित्र ऋषी बावणे यांना मिळाली. लागलीच त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही सापाला पकडले. परंतु आणखी काही बोऱ्या हटविल्या नंतर सापाची पिल्ले दिसली... एक नाही तर तब्बल २१ सापाचे पिल्ले होती... ते पाहून शेतकरी भयभीत झाला... त्या सर्व सापाला ताब्यात घेतल्यावर हा साप नाग जातीचा मादी व नर असून या मादीने २१ पिलांना जन्म दिला होता. त्यांनी सर्व पिलांची योग्य काळजी घेऊन सर्व पिल्ले तसेच साप व त्याच्या २१ पिल्लाला रामटेक वनविभागात आणण्यात आली आणि रेंज अधिकारी राहुल शिंदे यांचा समक्ष पंचनामा करण्यात आला व वाइल्ड चॅलेंजर ऑगनायझेशन चे सर्पमित्र अजय मेहरकुळे, सागर घावडे, ऋषी बावणे, लकी मरस्कोल्हे यांचा सोबत चोरबावली जंगलात त्यांना सोडण्यात आले. शेतकऱ्यांनी सर्पमित्राचे आभार मानले..
