मुबंई प्रतिनिधी : (सतिश वि.पाटील)
मुंबई: मुलुंड (पश्चिम) येथील वीणा नगरमध्ये नवीन पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असल्याने शनिवारी १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे... या काळात नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
मुलुंडमधील वीणा नगरमधील योगी हिल रोडवरील प्रस्तावित विकास नियोजन (डीपी) रस्त्यावर ६०० मिमी व्यासाची पाईपलाईन जोडण्याचा प्रस्ताव आहे. पाईपलाईन जोडणीचे काम शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत १२ तासांच्या कालावधीसाठी केले जाणार आहे... या कामामुळे मुलुंड (पश्चिम) येथील ‘टी’ वॉर्डमधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे...
मुलुंड (पश्चिम) मध्ये मलबार हिल रोड, स्वप्ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाउन रोड, योगी हिल रोड, घाटीपाडा, बी.आर. रोड भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे... संबंधित भागातील नागरिकांना दुसऱ्या दिवशी पाणी साठवून ठेवण्याचा आणि पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे... खबरदारीचा उपाय म्हणून, पाणी उकळून आणि गाळून तीन ते चार दिवस पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे...
