महाराष्ट्र वेदभुमी

EPS-९५ पेन्शन धारकांची सभा; सभेनंतर वृक्षारोपण..

पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर): मंगळवार दि.१० जुन २०२५ रोजी सकाळी ठिक १० वा.विठ्ठल मंदिर-रोहा येथे,राष्ट्रीय संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.अशोकजी राऊत(कमांडर) साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय संघर्ष समितीचा ८ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी रोहा  EPS-95 पेन्शन धारकांची सभा संपन्न झाली....

 यावेळी सभेत जवळपास ७० सभासद उपस्थित होते.... कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपं प्रज्वलन करून, निधन झालेल्या पेन्शनर धारकांस सर्वांनुमते भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करणेंत आली...यानंतर वसंत शेलार यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले... नंतर शामराव येलकर, अशोक मोरे, ठमके, देवराम कर्णेकर, दगडू बामुगडे यांनी राष्ट्रीय संघर्ष समितीचे ध्येय धोरण या विषयी आपले मनोगत व्यक्त केले... तसेच अध्यक्ष मालू पाबरेकर यांनी राष्ट्रीय संघर्ष समितीने आतापर्यंत केलेल्या व सध्या सुरु असलेल्या कार्य धोरणाची सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली...

   तसेच एन्.ए.सी.(राष्ट्रीय संघर्ष) समिती पेन्शन धारकांना पेन्शन वाढीसाठी निस्वार्थपणे पारदर्शक असे काम करत आहेत... यावर आमचं पुर्णपणे विश्वास आहे.असे सर्वांनुमते एक दिलाने संकल्प केले आहे....

नंदकुमार भादेकर यांनी सर्वच उपस्थितांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली... तसेच कार्यक्रमा नंतर कमांडर  अशोकजी राऊत यांच्या सुचनेनुसार रोहा येथील म्हाडा ठिकाणी असलेल्या मराठा भूवन जागेमध्ये राष्ट्रीय संघर्ष समितीचे सर्वच उपस्थित पदाधिकारी यांनी झाडे लावण्याचे सुंदर असे कार्य पार पाडले...

Post a Comment

Previous Post Next Post