महाराष्ट्र वेदभुमी

आंबेवाडी गावाच्या रस्त्यालगत उघडा ट्रान्सफॉर्मर, महावितरण कंपनीचा कानाडोळा...

नागरिकांच्या जिवाला धोका,

 पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर): रोहा तालुक्यातील कोलाड रोहा रस्त्यावरील आंबेवाडी गावाच्या रस्त्यालगत असणाऱ्या महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर असुन तो अनेक दिवसापासून उघडा स्थितीत आहे... याकडे मात्र महावितरण कंपनी डोळे झाक करीत असुन या उघड्या असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमुळे या मार्गाने जाणारे नागरिक तसेच विद्यार्थी वर्ग यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे...

  आंबेवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडांझुडपात महावितरण कंपनीने बसवलेला  हा अनेक दिवसापासून उघड्या स्थितीत आहे... या उघड्या  ट्रान्सफॉर्मरच्या सभोवताली झाडांझुडपे आहेत... जर या ठिकाणी पाऊस पडला तर ओल्या झालेल्या झाडांमुळे शॉक लागून मोठा अनर्थ घडू शकतो... तसेच जवळ रायगड जिल्हा परिषद शाळा आहे... यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवाला ही धोका निर्माण होऊ शकतो.. 

प्रतिक्रिया: एखादा महिना लाईट बिल भरला नाही तर विज ग्राहकाची लाईट कट केली जाते... परंतु उघडी असलेली ट्रान्सफॉर्मरचे झाकण बसविण्यासाठी मात्र महावितरण कंपनीचा कानाडोळा... यामुळे कोणाचा नाहक बळी जाऊ शकतो... कोणतेही मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा महावितरण कंपनी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल... चंद्रकांत लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक- आंबेवाडी...

Post a Comment

Previous Post Next Post