महाराष्ट्र वेदभुमी

रोहा प्रेसक्लबची सामाजिक बांधिलकी, वट पौर्णिमेला केले वृक्षांची लागवड.

कोलाड (श्याम लोखंडे) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेl पक्षीही सुस्वरे आळवीती ll साधू संत महात्मे लिखित आहे की झाडांवर प्रेम करा त्यांचे प्रेम घ्या वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान.निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.त्याच धर्तीवर गेली अनेक वर्षे रोहा प्रेसक्लब च्या वतीने पर्यावरणाची सामाजिक बांधिलकीतुन वटपिर्णिमा या दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करत आहेत परंतु वृक्ष संपदा जोपासण्याची आजची गरज असल्याचे प्रतिपादन रायगड प्रेसक्लबचे माजी उपाध्यक्ष तथा रोहा प्रेस क्लबचे मार्गदर्शक पत्रकार राजेंद्र जाधव यांनी केले...

गेली आठ वर्ष प्रेस क्लबच्या प्रधान सचिव समिधा अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत असून सालाबादप्रमाणे याही वर्षी रोहा प्रेसक्लब तसेच रोहा भुवनेश्वर येथील एकता नगर ग्रामस्थांच्या  संयुक्त विदयमाने रोहा तालुक्यातील एकता नगर परिसरात वड,पिंपळ,जांभूळ,चेरी, चाफा, कडुनिंब,अशी वेगवेगळी प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली या प्रसंगी जाधव यांनी उपस्थित वृक्षप्रेमींना मौलिक मार्गदर्शन केले...

यावेळी रोहा प्रेसक्लबचे अध्यक्ष सुहास खारिवले,माजी अध्यक्ष शशिकांत मोरे,जेष्ठ पत्रकार अरुणकाका करंबे, प्रेस क्लबच्या प्रधान सचिव सौ समिधा अष्टीवकर,सचिन शेडगे, सचिव विशू लुमन, खजिनदार संदीप सरफळे, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष डॉ श्याम लोखंडे, रविंद्र कान्हेकर,विशू लुमन, उद्धव आव्हाड, सागर जैन, केशव म्हस्के,अंजुम शेटे, नीलम सावंत,दीपाली जाधव, नंदकुमार बामुगडे, संतोष सातपुते,सह प्रेसक्लबचे सदस्य तसेच पर्यावरण प्रेमी व एकता नगर भुवनेश्वर येथील 

एन टी शिंदे, मनोहर सकपाळ, ग्राम पंचायत सदस्या अपूर्वा शिंदे, वसंत घाणेकर,विनोद महाडिक, दीपक पाटील, उदय करडे, वसंत तवटे,अमित थळे, प्रमोद गुंड, विराज गुरव, संतोष चंदने,प्रकाश रातवडकर, सौ रातवडकर, सौ तवटे,आदी ग्रामस्थानी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होत यावेळी वृक्षारोपण केले...

समाजातील प्रत्येक माणसाने एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना मनाशी बाळगत पर्यावरण वाचवण्याकरिता मदत केली पाहिजे ही संकल्पना उराशी बाळगून गेली अनेक वर्षे प्रेस क्लब हा उपक्रम राबवत असून आज पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण येथे वृक्ष लागवड करत आहोत तसेच गेली अनेक वर्षाचा हाती घेतलेला उपक्रम फलदायी ठरत आहे रोहा प्रेस क्लबने रोहा,धाटाव, पालदाड,निवी लांढर कळवा रोड लगत लावलेली झाडे आज आपल्याना सावली देत असल्याचे रविंद्र कान्हेकर यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले.तर उपक्रमाचे शेवटी पर्यावरण प्रेमी तसेच भुवनेश्वर एकता नगर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post