कर्नाटक/ १० जून/प्रतिनिधी/:पत्नीच्या कथित प्रेम प्रकरणातून जोडप्यामध्ये वाद झाला... हा वाद विकोपाला गेला अन् पतीने पत्नीचं शीरच धडावेगळं केलं... यानंतर पत्नीचं शीर घेऊन पती पोलीस ठाण्यात हजर झाला...
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे... मानसा असे मयत पत्नीचे नाव तर शंकर असे आरोपी पतीचे नाव आहे... याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे...
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे... शंकरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे पती-पत्नी हिलालिगे गावात भाड्याच्या खोलीत राहत होते... शंकर तेथेच काम करत होता. 3 जून रोजी रात्री शंकर कामावरून परतला तेव्हा त्याने आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहिले... यावरून दोघांमध्ये भांडण झाले... यानंतर मानसा घर सोडून निघून गेली... मात्र मानसा वारंवार घरी येऊन शंकरसोबत भांडण करायची...
मानसा शुक्रवारी रात्रीही घरी आली आणि त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. यामुळे शंकरला राग अनावर झाला आणि त्याने शीर धडावेगळे केले... पत्नीची हत्या केल्यानंतर तिचे शीर हातात घेऊन शंकर सूर्यनगर पोलीस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली...पोलिसांनी शंकरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे...
