महाराष्ट्र वेदभुमी

मायबाप फाउंडेशन तळा यांचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम


सत्यवान रेडकर यांच्याकडून करीयर मार्गदर्शन

प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा: मायबाप फाउंडेशन तळा - रायगड (रजि.) ई १५७० यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार स्वाती पाटील , मंडळ अधिकारी किशोर मालुसरे , रायगड बँक संचालक  ज्ञानेश्वर भोईर , राज्य सचिव पोलीस पाटील संघटना कमलाकर मांगले , ज्येष्ठ पत्रकार किशोर पितळे , जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती विजय येलवे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर गोळे , प्राध्यापक पप्पू मोहिते आणि करियर मार्गदर्शक सत्यवान रेडकर  उपस्थित होते.

             मायबाप संस्थेने आयोजित या कार्यक्रमात तळा तालुक्यातील १२ माध्यमिक विद्यालयातील १० वी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी तसेच १२ वी कला , वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी तसेच मायबापचे सदस्य रुद्र थिटेकर इ. ५ वी मध्ये नवोदय प्रवेश परीक्षा , शिष्यवृत्ती परीक्षा , गणित संबोध परीक्षा तळा तालुक्यात उत्तुंग यश मिळवल्याबद्दल कुमारी रिचा विजय येलवे हिने १० वी परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याबद्दल सर्वांचा ट्रॉफी , शैक्षणिक साहित्य , पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच अमिष भौड यांना रा.जि.प. अलिबाग आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ व कांतीलाल कसबले यांची तळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मायबाप कडून सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे हा पहिलाच नावीन्य पूर्ण उपक्रम असल्याचे मान्यवरांनी विचार व्यक्त केले. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना १०/१२ वी नंतर काय करावे. यासाठी सत्यवान यशवंत रेडकर यांनी करिअरच्या संधी आणि वाटा त्यासाठी आवश्यक पात्रता तसेच ध्येय व पराकष्ठा यांच्या माध्यमातून यश मिळवता येते. असे स्वतःच्या उदाहरनातून पटवून दिले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अशा उपक्रमांसाठी मायबाप नेहमीच अग्रेसर असतात . गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीच मायबाप ने आधार दिला आहे...          

       आजच्या कार्यक्रमात नवोदय विदयालयात शिकणारे विद्यार्थी वीर तळकर , ऋषी तावडे , श्रावणी मोरे व आरती जाधव यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य केले. सर्वांनी मायबापच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुनिल बैकर , सचिव सचिन भाटे , खजिनदार किरण नागावकर तसेच कार्यकारणी सदस्य कांतीलाल कसबले , राजू थिटेकर ,अमिष भौड , स्नेहल बैकर- तांबडे, दिपक शिगवण, स्वप्नील वरंडे, मनोज वाढवल , किरण सातांबेकर , रोशन फराडे, सुनैना भौड , अरुणा येवले, प्रियांका थिटेकर ,सुषमा कसबले , रवींद्र फडके, जितू भोसले , देवचंद खामदेकर आणि सहकारी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सचिन भाटे आणि संजय म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज वाढवल आणि जितू भोसले यांनी केले..

Post a Comment

Previous Post Next Post