महाराष्ट्र वेदभुमी

सालई (हि.) येथे प्रवेशोत्सवाच्या दिवशी झाले बाल वाचनालयाचे उद्घाटन

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- जि. प. उच्च प्राथमिक शाळा, सालई (हि.) येथे सोमवारला शैक्षणिक सत्र २०२५ - २६ ला शाळेच्या पहिल्याच दिवशी "शाळा प्रवेशोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत नव्याने दाखल सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश, जोडे-मोजे, वह्या, पाणी बॉटल व इतर लेखन साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते बाल वाचनालयाचे थाटात उद्घाटन झाले..

एनटीपीएस संस्था, सालई (हि) चे संस्थापक भाल यांच्याकडून जि. प. उच्च प्राथमिक शाळा, सालई (हि.) येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी जवळपास पंधरा हजार रुपये किमतीची पुस्तके, दोन संगणक संच, तीन लॅपटॉप, पाच खुर्च्या, '४० क्रीडा गणवेश हे साहित्य सदिच्छा भेट म्हणून प्रदान करण्यात आले... शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून एनटीपीएस संस्था, सालई (हि.) कडून प्राप्त झालेल्या पुस्तकांसह शाळेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल वाचनालय' चे उद्घाटन करण्यात आले. बाल वाचनालयाचे उद्घाटक म्हणून एनटीपीएस चे संचालक मंडळातील सदस्य गराड सर, पंचमजी चौधरी (माजी पं. स. सदस्य) यांचेसह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांतजी मेहर, प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच मा. उत्तमरावजी धराडे, गटशिक्षणाधिकारी विजय भाकरे. शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शालिनीताई रामटेके, केंद्रप्रमुख प्रमोद सुरोसे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुधीरजी चौधरी, नामदेवजी सोनवाने, पालक व प्रतिष्ठित नागरिक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक  नेतराम इंगालकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल किनाके (स. शि) यांनी तर आभार प्रदर्शन श्री. चेतन राशिनकर यांनी मानले... कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण स्वयंसेवक महेंद्र बावणे, शिल्पा मोरे, रिनाताई राऊत, फुलन राऊत आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले...

Post a Comment

Previous Post Next Post