महाराष्ट्र वेदभुमी

पर्यावरण प्रेमी निघाले पंढरपूरला ७५० किमी अंतर कापणार ६ दिवसात


सचिन चौरसिया रामटेक

रामटेक: टायगर ग्रुप ऑफ अ‍ॅडव्हेंचर नागपूर आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीला नागपूर ते पंढरपूर अशी ६ दिवसांची सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ७५० किमी सायकलने प्रवास केला जाणार आहे. ही यात्रा १५ जून रोजी नागपूरहून पंढरपूरसाठी निघेल... नागपूरमधील ८० सायकलस्वार आणि राज्यातील ९० संघटनांचे ३००० हून अधिक सायकलस्वार या यात्रेत सहभागी होतील. रामटेकच्या सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्थेचे ६ सदस्य या यात्रेत सहभागी झाले आहेत. शनिवारी, १४ जून रोजी दुपारी २ वाजता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी रामटेकच्या गांधी चौकातून सायकलस्वारांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला... १५ जून रोजी नागपूरहून सुरू होणाऱ्या सायकल यात्रेत ते सामील होतील... रामटेक ते पंढरपूर या सायकल यात्रेत सहभागी होणाऱ्यांमध्ये संस्कृत विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक कुलसचिव रामचंद्र जोशी, राजेश बाकडे, समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव ऋषिकेश किंमतकर, किट्स प्रा. लक्ष्मीकांत तिबुडे, सारंग पंडे आणि १३ वर्षीय अभंग किंमतकर यांच्या समावेश आहे... यावेळी डॉ.ललिता चंद्रते, डॉ.अंशुजा किंमतकर, सुमिता मोकदम, अश्विनी तिबुडे, ॲड. संजय खंडेलवाल, माजी नगरसेवक सुमित कोठारी, वेदप्रकाश मोकदम, अनिल वाघमारे, दत्तू पंडे, सोनू पेठेकर, राजेश किंमतकर, आनंद रहाटे आदी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post