कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्रसेवा
मुंबई दि.१५ : १७वर्षाचा आर्यन पहिल्यांदाच विमान एवढ्या जवळून पाहिला होता... त्याला काय माहित त्याने बनवलेला व्हिडिओ क्लिप पुढे मोठ्या दुर्घटनेचा साक्ष ठरेल... गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एअर इंडिया फ्लाईट AI171 या विमानाची दुर्घटना झाली...
आर्यन हा मिहाडी नगरचा राहणार आहे... त्यादिवशी तो टेरेसवर उभा होता... त्याने पाहिले विमान खूप खालून जात आहे...त्याने एवढ्या खालून विमान जाताना पहिल्यांदा पाहिले. त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईल मधून व्हिडिओ बनवला. कारण गावाला गेल्यावर मित्रांना दाखवीन की बघा आमच्या घरावरून विमान उडतंय. तेव्हाच विमान अपघात झाला... विमान पडला आगीचा आगडोंब झाला, माणसे मृत्यूमुखी पडली.मोठी जीवितहानी झाली...
आर्यन चा व्हिडिओ हा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे... पोलिसानी आर्यनला चोकशीसाठी घेऊन गेले...तो खूप घाबरलेला होता. आर्यानने काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सर्वत्र याबाबत चर्चा सुरू झाली. याला कसं माहिती विमान अपघात होणार आहे... त्यामुळे पोलिसांनी आर्यनवर कारवाही करणे भाग पडले. आर्यन म्हणाला,” आयुष्यात कधीही विमानात बसणार नाही... ”
