महाराष्ट्र वेदभुमी

गुगुलडोह गावाला मिळाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक: ग्रामीण विकास विभागाकडून १० जून २०२५ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, गुगुलडोह हे स्वतंत्र महसूल गाव आणि पंचाळा ग्रामपंचायत हे स्वतंत्र महसूल गाव म्हणून घोषित करण्यात आले. रामटेकचे आमदार तथा राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे हे साध्य झाले... यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे... सात वर्षांनंतर, रामटेक तहसीलमधील गुगुलडोह येथील नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे. पंचाळा (बु.) ग्रामपंचायतीचे विभाजन करून, गुगुलडोह आता स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात आली आहे... ग्रामपंचायत विसर्जित केल्यानंतर प्रशासक त्याचा कारभार पाहतील.. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर प्रशासन लोकप्रतिनिधींच्या हाती जाईल... तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या शोभा झाडे आणि पंचाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय झाडे २०१९ पासून ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत होते... रामटेक तहसीलमध्ये १५७ गावे आहेत आणि ही सर्व गावे ४५ ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत... गुगलडोह गाव पूर्णपणे आदिवासी गाव म्हणून ओळखले जाते... सध्या या गावाची लोकसंख्या १३०० आहे.. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांनी याबाबत सतत पाठपुरावा करीत होते...

Post a Comment

Previous Post Next Post