रोहा :- रोह्यात पोक्सो गुन्हे अंतर्गत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बरोबर २५ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर या तरुणाने तीला अश्लील मॅसेजद्वारे चॅटिंग केली. हे मॅसेज दुसऱ्या तरुणाच्या हाती लागल्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीला सदर अश्लील मॅसेज व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सदर घटना रोहे तालुक्यातील उसर गावात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. रोहा पोलिसांनी बुधवारी रात्री दोन्ही आरोपिंना बेड्या ठोकल्या आहेत.
या बाबत घडले असे की, उसर गावातील १४ वर्षीय मुलीने इन्स्ट्राग्रामवर अकाउंट सुरु केला. एप्रिल २०२५ रोजी आरोपी ओमकार संजय पिंपळे ( वय २५ रा. तळवली ता. रोहा ) याने इन्स्टाग्रामवर मॅसेज करुन त्या अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. या दरम्यान आरोपी ओमकार पिंपळे याने पीडित अल्पवयीन मुलीला अश्लील मॅसेज केले होते.हे मॅसेज आरोपी रवींद्र सावंत ( वय २५ रा. नागोठणे ता. रोहा ) याच्या हाती लागले. सदर अश्लील मॅसेज मी सर्वत्र व्हायरल करेन अशी धमकी देऊन पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करुन उसर गावातील गणेश गावडे यांचां बंद अवस्थेत असलेल्या घरात नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. सदर घटना कोणाला सांगितली तर तुला मारून टाकेन अशी धमकी देखील देण्यात आली...
