कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. सुमारे २ लाख ६९ हजार रुपये किमतीचा बनावट तणनाशकाचा मोठा साठा कोलाड आंबेवाडी येथे जप्त केला. कोलाडजवळ आंबेवाडी परिसरात कृषी विभागाने कोलाड पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या तोंडावर मोठी फसवणूक टळली मात्र या धडक कारवाहीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे...
आंबेवाडी येथील ओम तेल घाणा केंद्रामध्ये अवैधरीत्या अनधिकृत विनापरवाना तणनाशक विक्री सुरू असल्याची खात्रीलायक बातमी कृषी विभागाला मिळाली होती,.. त्यावरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून तणनाशक विक्री करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले...
हे बनावट तणनाशक प्रतिलिटर ९६० रुपये किमतीच्या २८० बॉटल जप्त करण्यात आल्या असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ६८ हजार ८०० रुपये इतकी आहे. विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडे कुठल्याही प्रकारचा विक्री परवाना, उत्पादन नोंदणी क्रमांक सापडला नाही, त्यामुळे जप्त केलेली तणनाशके विश्लेषणाकरता प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे व जिल्हा कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी महेश नारायणकर व जिल्हा गुणवत्ता गुण नियंत्रण निरीक्षक बुद्धभूषण मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली व कोलाड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली...
या प्रकरणात संबंधित विक्रेत्याविरोधात फसवणूक व कीटकनाशक अधिनियम १९६८ व कीटकनाशक नियम १९७१ अन्वये विविध बाबी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड आंबेवाडी येथील धनजीभाई लाखाभाई कातारीया वय ५४ वर्षे रा समर्थनगर आंबेवाडी मुळ रा. वसईरोड वसई जि.पालघर यांचे कडे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे ज्या कंपनीकडे परवाना नाही तसेच विक्री करणाऱ्या या दुकानदाराकडे कडे देखील परवाना नाही तणनाशकांचा महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाकडे नोंदणी नसलेली Linuxcrop chemicals pvt.ltd या गुजरात राजकोट येथील कंपनीचा माल विनापरवाना गैरकायदा आपले ताबेकब्जात ठेवुन स्वतचे आर्थिक फायदयाकरीता शासनाची फसवनुक करून विक्री ठेवण्यास आल्याचे आढळून आले असून कोलाड पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार / अधिकारी पोसई एस.जी. भोजकर हे अधिक तपास करत आहेत...
