महाराष्ट्र वेदभुमी

गळफास घेऊन तरुणाने संपवले जीवन

 


सचिन चौरसिया रामटेक

रामटेक : स्थानिक अंबाळा वळणाजवळ वनविभागाच्या कॉर्टर येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली... ही घटना गुरुवार (ता.१२) दुपारी २ वाजता उघडकीस आली... रितेश देविदास चौधरी (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे... तो एका खासगी कंपनीत वेल्डिंग कामाला होता. प्राप्त माहितीनुसार, मृतक रितेश हा दुधाला येथे निर्माण कार्य सुरू असलेल्या कंपनीत वेल्डिंगचे काम करायचा... वडील देविदास चौधरी हे मृगविहार रामटेक येथे देखरेख कर्मचारी आहेत... गुरूवारी रितेश कामावरगेला नाही. घटनेच्यावेळी वडील ड्युटीवर गेले होते... आई बाजारात किराणा खरेदीसाठी गेली होती... दुपारी २ च्या सुमारास घरी कोणीही नव्हते... ही संधी साधुन रितेशने नायलॉन दोरीने गळफास घेतला... आई किराणा घेऊन घरी आल्यावर ही बाब लक्षात आली... तिने लागेच ही माहिती पती देविदास चौधरी यांना दिली... माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला... मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रामटेक उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. रितेशच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही... पुढील  तपास पोलीस करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post