महाराष्ट्र वेदभुमी

उद्योगपती, क्रिकेटर, छकडेवाला दिपकशेठ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात


दिपकशेठ पाटील बिनजोड छकडेवाला !

कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभुमी वृत्तसेवा

चिरले, उरण दि.०९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, उद्योगपती, बिनजोड छकडेवाला दिपकशेठ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात चिरले, उरण  येथे त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला.

दिपकशेठ पाटील यांचा जन्म उरण येथील चिरले गावात झाला... शालेय शिक्षण घेत घेत त्यांनी द्रोणागिरी सीएफएस मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली... नोकरी करत करत ते उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केले आणि उद्योगपती म्हणून लवकरच ते उदयास आले... राधे इंटरप्राईजेस हया कंपनीचे ते मालक आहेत... भूमिका क्रिकेट स्पोर्ट्स च्या माध्यमातून ते  अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत... नाईट क्रिकेट सामने भरणारे ते उरण तालुक्यातील पहिले व्यक्ती आहेत... आणि तशी नोंद उरण तालुक्यात त्यांच्या नावावर आहे.परंतु आपली आवड आपला छंद ते जोपासत ते बैलगाडी शर्यतीकडे वळले व अल्पावधीत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिनजोड छकडेवाला म्हणून प्रसिद्ध झाले...

मेहबूब,मेहरबान,रॉबिन या बैलांचे ते मालक आहेत... या बैल जोडीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये  बिनजोड छकडेवाला म्हणून नावलौकिक कमावले... २०१७ पासून ते सतत बैलगाडी शर्यत जिकत आलेले आहेत... २०१७ पासून ते महाराष्ट्रामध्ये बिनजोड छकडेवाला म्हणून प्रसिद्ध आहेत...

महाराष्ट्र वेदभूमीशी बोलताना दिपकशेठ पाटील म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट घेऊन, फोन द्वारे, एसएमएस द्वारे सोशल मीडिया मार्फत व्हाट्सअप ,फेसबुक मार्फत मला शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या पंचक्रोशीतील जनता हे माझे कुटुंब आहे. आणि कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांना मदत करणे हे मी माझे  परम कर्तव्य समझातो. मी आजतागायत जनसेवा करत आलोय आणि यापुढेही करत राहील. मी जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद !

अष्टपैलू क्रिकेटपटू,उद्योगपती आणि महाराष्ट्र मध्ये बिनजोड छकडेवाला म्हणून प्रसिद्ध असलेले दिपकशेठ पाटील राहणार-चिरले, उरण यांना महाराष्ट्र वेधभुमी  परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

Post a Comment

Previous Post Next Post