महाराष्ट्र वेदभुमी

नेरुळ स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड; हार्बर रेल्वे ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई- हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ठप्प झाली.... सीएसएमटी-पनवेल या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकलसेवा ठप्प आहे... यामुळे कामाला जाण्याच्या वेळेत स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली... परिणामी लोक त्रस्त झाले...

सध्या नेरुळ स्थानकात लोकल थांबून राहिल्या... तर पनवेलहून अप मार्गाकडे निघालेल्या बेलापूर आणि सीवूड्स स्थानकातही अनेक गाड्या थांबवण्यात आल्या, यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला... ऐन कामाच्या वेळी लोकसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.... रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले..  वाशी-पनवेल, वाशी-ठाणे मार्गावरील सेवा प्रभावित झाली असून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर लोकल ट्रेनमध्ये विलंब... तर काही ट्रेन वाशी स्थानकातच थांबवण्यात आल्या...

Post a Comment

Previous Post Next Post