अरुण चवरकर यांनी केला सत्कार
उरण दि २५(विठ्ठल ममताबादे): उरण पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संतोष गायकवाड यांची उरण शहराच्या पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे अध्यक्ष अरुण चवरकार व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले...
संतोष गायकवाड यांनी काही वर्ष पनवेल ट्राॅफिक पोलिस म्हनून चांगली कामगिरी केल्याने वरिष्ठांनी ही कौतुक केले आहे...त्यानंतर क्राईम ब्रांच बेलापूर येथे अनेक वर्षे कौतुकास्पद कामगिरी करून पोलिस खात्यात आपल नाव लौकीक केलं... आजही परराज्यातून आरोपी शोधून आणायचे असेल तर संतोष गायकवाड यांच्यावर कामगीरी सोपवली जाते... आणि ते जबाबदारी पूर्ण करून दाखवतात असे उदगार सत्कार करताना उपस्थित उरणचे पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी पत्रकारांना सांगितले... संतोष गायकवाड यांच एक वैशिष्ट् त्यांनी अनाथ मुलींना दत्तक घेऊन शिक्षण देऊन लग्न लावून दिलं... या सत्कार प्रसंगी,ए पी आय खाडे,महेश भोईर, विकास गुरसाळे आदी मान्यवर उपस्थित होते...