पुगाव- रोहा (नंदकुमार कळमकर)आपण सर्वांच्या सहकाऱ्याने गेले कित्येक वर्षे तीर्थयात्रा विविध धार्मिक ठिकाणी पंचक्रोशी जंगम समाजाच्यावतीने काढण्यात आले आहे. हे करत असताना पंचक्रोशी रोहा जंगम समाजाने एकत्रित येत समाजातील विविध अडीअडचणी प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पंचक्रोशी जंगम समाजाचे प्रयत्न राहणार आहेत. हे उद्दिष्टे व ध्येय धरूनच पंचक्रोशी जंगम समाज रोहा एकत्रित येत काम करणार असल्याचे पंचक्रोशी जंगम समाज रोहाचे अध्यक्ष लक्ष्मणस्वामी जंगम यांनी रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित पंचक्रोशी जंगम समाज रोहाच्या विद्यार्थी गुणगौरव व महिलांचा हळदीकुंकू या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी लक्ष्मणस्वामी जंगम यांनी यापुढे पंचक्रोशी रोहा जंगम समाजाच्यावतीने तीर्थयात्रा समाजातील तीर्थक्षेत्राकडे काढणार असल्याचे आवर्जून सांगितले...
यावेळी उपाध्यक्ष मनोहरस्वामी जंगम, माजी अध्यक्ष हरिभाऊस्वामी जंगम, सेक्रेटरी विनोदस्वामी जंगम, खजिनदार अरुणस्वामी जंगम, सहखजिनदार किरणस्वामी जंगम, चिटणीस वीरेंद्रस्वामी जंगम, सल्लागार महादेव सरसंबे, काशिनाथस्वामी जंगम, प्रकाशस्वामी जंगम, संतोषस्वामी जंगम (पुणे), श्रीकांतस्वामी जंगम, राजेंद्रस्वामी जंगम, कृष्णास्वामी, दिगंबरस्वामी, प्रमोदस्वामी, राकेशस्वामी, मयूरस्वामी, मारुतीस्वामी, रमाकांतस्वामी, श्रीकांतस्वामी, गणेशस्वामी, निलेशस्वामी, महेंद्रस्वामी, संतोषस्वामी, रघुनाथस्वामी, रमेशस्वामी, युवराजस्वामी, गोपीनाथस्वामी त्याचबरोबर समाजातील तरुण- तरुणी तसेच ज्येष्ठ-श्रेष्ठ माहेश्वर आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग यावेळी उपस्थित होता....
यावेळी विनोदस्वामी जंगम यांनी समाजाच्या उन्नतीसाठी जंगम समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले... महादेव सरसंबे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजाने उठवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. किरणस्वामी जंगम यांनी समाज एकत्रित होत असताना समाजाच्यावतीने यापूर्वी होत असलेल्या शिवपाठसह अन्य उपक्रम चालू राहणार असल्याचे सांगितले... हरिभाऊस्वामी जंगम यांनी पंचक्रोशी जंगम समाजाच्यावतीने राबवण्यात असलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले...
यावेळी प्रमोदस्वामी जंगम यांनी प्रास्ताविकात पंचक्रोशी जंगम समाजाचे उद्दिष्टे, ध्येयधोरणे सांगितली. यावेळी सौ प्रगती मिलिंद जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वीरेंद्रस्वामी जंगम यांनी तर आभार प्रकाशस्वामी जंगम यांनी मानले...
या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्प सान्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला... यावेळी महिलांचा हळदीकुंकूचा कार्यक्रम भव्य स्वरूपात घेण्यात आला...
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पंचक्रोशी जंगम समाजाचे पदाधिकारी व जंगम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता... महिलांची उपस्थिती लक्षणीय होती...