माजी खा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण स्थगित
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्रसेवा
जासई, दि.२४ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी, या मागणीसाठी दि. बा. पाटील यांचे शिष्य आणि कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील २४ जून २०२५ रोजी (दि. बा. पाटील यांच्या १२ व्या स्मृतीदिनी) जासई येथे हुतात्मा स्मारका जवळ आमरण उपोषण सुरू केले होते...
२०२० पासून या नामकरणासाठी आंदोलन सुरू असून, महाराष्ट्र विधानसभेने ठराव करून तो केंद्राकडे १६ जुलै २०२२ रोजी पाठवला आहे. वारंवार बैठका होऊनही अद्याप निर्णय न झाल्याने जनतेत संभ्रम आणि असंतोष आहे... विमानतळाच्या उद्घाटनाच्या अनेक तारखा पुढे ढकलल्या जात असून, नावाची अधिसूचना अद्याप निघालेली नाही... नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी... या मागणीसाठी कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील हे उपोषणाला बसले होते...
विमानतळ नामकरण समितीच्या टीम ने कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील त्यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेऊन त्यांना सध्या स्थितीत काय घडामोडी सुरु आहेत याबाबत विस्तुत माहिती दिली...
दि बा पाटील यांचे सुपुत्र अतुलदादा पाटील यांनी सांगितले, विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी नामकरण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांची भाषण झाली...
रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सरबत पिऊन कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांनी उपोषण स्थगित केले...
यावेळी विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर जेष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, वाय.टी.देशमुख, दि.बा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, दीपक म्हात्रे , कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र म्हात्रे, नंदराज मुंगाजी, सुधाकर पाटील, विनोद म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, सीमा घरत, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा डी. बी. पाटील सर उपस्थित होते...