महाराष्ट्र वेदभुमी

रोहा गोफण येथे मुसळधार पावसात विद्युत तारांसह विद्युत खांब जमीनदोस्त, विद्युत पुरवठा खंडित,

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पावसाने थैमान घातले असून बुधवारी 18 जून रोजी वादली वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये गोफन गावाला वीज पुरवठा करण्यात येणारे विद्युत पोल विद्युत तारांसहित अचानक कोसळले त्यामुळे गोफण गाव आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे...

तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस बरसल्याने गोफन ते पारंखार या भागामध्ये संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती मिळताच या भागामध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी विधान परिषदेचे आमदार तसेच युवा नेते अनिकेत तटकरे यांनी रोहा तालुका विद्युत मंडळाचे उपअभियंता जतीन पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क करून गोफण ते पारखार या विभागाचा मुसळधार पावसात खंडित झालेला वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करावे असे त्यांना आदेश देण्यात आले...तसेच त्यांच्या आदेशाचे पालन करून संबंधित खात्याकडून कारवाई सुरू करण्यात आली असून अनिकेत तटकरे यांनी तत्परता दाखवल्याबद्दल चनेरा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून तसेच सदरील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त केले...

Post a Comment

Previous Post Next Post