महाराष्ट्र वेदभुमी

कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडली,धाटाव स्टॉपवरील पवार चाळीत घुसले पाणी,

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यात गेली दोन मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून येथील बारमाही वाहणारी कुंडलिका नदीने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून येथील धाटाव स्टॉपवरील पवार आणि राणे चाळीत पाणी शिरल्याने वस्तीत राहणारे भाडे करू तसेच अनेकांची तारांबळ उडाली तर खालील तळ भागातील घरात पाणी शिरल्याने रहवाशियांचे अन्न धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...

तालुक्यातील कुंडलिका नदीपात्र काठेवरीवरील काही भागात मुसळधार पावसामुळे नदीने धोका पातळी ओलांडल्याने धाटाव स्टॉपवरील दादाचाळ , राणे आणि पवार चाळीतील खालील घरातून अचानक पुराचे पाणी शिरले त्यामुळे दुचाकी, रिक्षा, तसेच काही वाहने अडकून पडली होती त्याच बरोबर हद्दीतील धाटाव पोलीस चौकी तसेच पोष्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी भरल्याने बँकेमध्ये जा ये करणाऱ्यांना पादचारी,तसेच काही वाहनं चालक यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली तर अधिक पाणी वाढल्याने काही बँकेमध्ये जाणारे खातेदार यांना पुन्हा माघारी फिरावे लागले होते...

Post a Comment

Previous Post Next Post