महाराष्ट्र वेदभुमी

दिघोडे येथे सब स्टेशनला १० गुंठे जागा उपलब्ध.

 

नागरिकांचा विजेचा प्रश्न लवकरच सुटणार.

माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश 

उरण दि २६(विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्याचा सध्या औद्योगिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. तालुक्याची ग्रामीण भागाची लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या आसपास आहे.दिवसेंदिवस विजेचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. अशातच उरण तालुक्यातील दिघोडे येथे सब स्टेशन नसल्याने त्याचा भार, ताण हा नागरिकांवर पडत होता. मेन लाईन वरून वीज व्यवसायिकांना दिल्याने वारंवार वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले होते. पावसाळ्यात खूप मोठा धोका निर्माण झाला होता. विजेच्या तारांचा शॉक लागून जीवितहानी झाली असती. तसेच अनेक गावात मोठया प्रमाणात भराव सुद्धा झाले त्यामुळे शॉक लागून मृत्यू होण्याचा संभव वाढला.जागोजागी मातीचे भराव केल्याने तसेच पावसाळा असल्यामुळे रात्री अपरात्री नागरिकांच्या घरात पाऊस पाणी जाऊन त्यांच्या जीवितेला धोका निर्माण झाला होता.या सर्व समस्या लक्षात घेऊन दिघोडे गाव व गावच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना विजेच्या योग्य सेवा सुविधा मिळाव्यात. नागरिकांना अंधारात राहावे लागू नये यासाठी दिघोडे येथे महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीचे सब स्टेशन व्हावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि माजी सदस्या कुंदा ठाकूर यांनी प्रयत्न सुरु केला  होता.माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि माजी सदस्या कुंदा ठाकूर यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती.वैजनाथ ठाकूर व कुंदा ठाकूर यांच्या पाठपुराव्याला आता यश आले असून सदर जमिनीवर सब स्टेशनचे काम सुद्धा सुरु झाले आहे...

दिघोडे गावात सब स्टेशन नसल्याने नागरिकांना होणारा त्रास, त्यांचे दुःख बघून माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर,कुंदा ठाकूर यांनी दिघोडे येथे महावितरण कंपनीचे सब स्टेशन व्हावे यासाठी सुरवातीपासूनच पाठपुरावा सुरू ठेवला.५ वर्षांपूर्वी ही जागा जिल्हा परिषदेने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी या जागेवर हरकत घेउन आपला अधिकार सांगितल्यामुळे हे काम थांबले होते. आता मात्र तहसीलदारांनी ही जागा शासनाची असल्याचा निर्णय दिल्यानंतर येथे सब स्टेशनच्या हालचालींना वेग आला आहे. दिघोडे गावात सब स्टेशन व्हावे यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले... दिघोडे येथे सब स्टेशन व्हावे यासाठी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री आदि ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार देखील केला होता.त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले असून बुधवार दिनांक २५ जून २०२५ रोजी दिघोडे येथे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सब स्टेशनच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार उद्धव कदम,महावितरणचे सहाय्यक अभियंता गजानन चव्हाण, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल लांडगे, मंडळ अधिकारी मनिष जोशी, ग्राम महसूल अधिकारी अमित दुलगज, विंधणे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेळके,तलाठी कार्यालयातील कर्मचारी प्रकाश म्हात्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर,चिर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत घरत, सामाजिक कार्यकर्ते आस्मक पाटील,विशाल पाटील,  मयुर पाटील आदी पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते...या सर्वच कामात मंत्री सुनील तटकरे, महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे, तहसीलदार उद्धव कदम यांचे विशेष सहकार्य लाभल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर व कुंदा ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत... सदर प्रश्न मार्गी लागावी यासाठी त्वरित ऍक्शन घेऊन तहसीलदार उद्धव कदम यांनी सर्व सूत्र वेगाने फिरविली. जर यापूढे दिघोडे सब स्टेशन किंवा आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिला आहे...

दिघोडे येथे ३० गुंठया पैकी १० गुंठे जागा आरोग्य विभागाला तर १० गुंठे जागा महावितरण वीज कंपनीला तसेच उरलेली १० गुंठे जागा इतर शासकीय कामा करिता तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून इमारतीकरिता देण्यात आली आहे.सदर ठिकाणी महावितरणच्या सब स्टेशनचे काम सुरु झाले आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर व कुंदा ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आरोग्य केंद्राचा,विद्युत सब स्टेशनचा व इतर गोष्टीचा लाभ गोर गरिबांना मोठया प्रमाणात होणार आहे... - उद्धव कदम, तहसीलदार, उरण 

 विद्युत सब स्टेशनचे काम सुरु झाले आहे... आरोग्य केंद्राचे सुद्धा काम सुरु आहे... त्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर हे कार्यरत असून दिघोडे आरोग्य केंद्रात नागरिकांना, रुग्णांना येण्या जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी वैजनाथ ठाकूर, कुंदा ठाकूर यांनी मंत्री सुनिल तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे...धुतुम ते दिघोडे हा रस्ता जनतेच्या सेवेत लवकरच येणार आहे...या रस्त्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे...त्यामुळे नागरिकांचा, रुग्णांचा प्रवास सुखकर होणार आहे... मॉर्निंग वॉक साठीही रस्त्याचा वापर होईल शिवाय अंडर पासिंग केबल सुद्धा टाकता येईल... रस्ता तयार झाल्यास नागरिकांच्या प्रवाशाचा वेळ सुद्धा वाचणार आहे....

Post a Comment

Previous Post Next Post