महाराष्ट्र वेदभुमी

मुरुड जंजिरा नगरपालिकेतील सफाई कर्मचारी पदवीधर झाला


मुरुड प्रतिनिधी : मुरुड जंजिरा नगरपालिकेतील सफाई कर्मचारी श्री जयेश मधुकर चोडणेकर यांनी परिश्रमाची एक खरी अनुभूती सिद्ध करून दाखविली आहे... त्यांनी कठोर परिश्रम करून यशाची उंच पायरी गाठली आहे... म्हणजेच ताकद आणि परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी एक आगळं वेगळं स्वप्न सत्यात उतरविणे आहे... आणि त्याचाच एक नवा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला आहे... त्यांनी इतिहास विषयात सहा पेपर देऊन ४५ टक्के गुण संपादित करून यश प्राप्त केले आहे... इतिहास घडविण्याचा लहानपणापासून असणारा संकल्प त्यांनी आज त्यांच्या स्वभावातून दाखवून दिला आहे...असे असले तरीही त्यांनी या यशाचे श्रेय मागील मुरुड जंजिरा महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी पंकज भुसे, तात्कालीन मुख्याधिकारी सचिन बच्छाव तसेच वसंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य कांबळे सर, म्हात्रे सर, मुनवेश्वर सर तसेच इतर स्टाफ यांना दिले आहे... त्यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला त्यांनी मोलाचा मान दिला आहे..

घरातल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आपले शिक्षण आज जिद्दीने पूर्ण केले आहे...१९९५ ला बारावीमध्ये दोन विषयात फेल झाले होते...पण २०१६ मध्ये त्यांनी बारावीची परीक्षा देऊन २० वर्षांनी ते उत्तीर्ण झाले....पुढे सहा वर्षांनी त्यांनी वसंतराव नाईक कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून एक नवा इतिहास घडविला.. आणि एक पदवीधर होण्याचे स्वप्न साकार केले... आज ते ४७ वर्षाचे युवक आहेत... त्यात अजून विशेष म्हणजे येत्या दोन महिन्यात त्यांचे क्लार्क पदावर प्रमोशन होणार आहे.. अशी माहिती श्री जयेश मधुकर चोडणेकर मुरुड जंजिरा रायगड यांनी दिली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post