पेण प्रतिनिधी
पेण नगरपालिकेचे दुर्लक्ष,मान्सून पूर्व नियोजनाची तयारी कुचकामी
खराब पाणी, खराब रस्ते, फेरीवाले, ट्रॅफिक समस्या, पार्किंगचे शुन्य नियोजन, शहरात सुलभ शौचालय यांचे नियोजन करता येत नसेल तर,यांच्या बदल्या करा जनतेची मागणी, पेण शहरामध्ये मोठया प्रमाणात तयार होणाऱ्या नवीन इमारती, आरक्षण, नवीन गाळे जागोजागी उभारलेले आहेत.. यात अधिकृत- अनधिकृत किती याची माहिती नाही,शहरात शहरीकरण वाढवता मग अगोदरच्या स्थानिक लोकांच्या नियोजनाचे काय? ही सर्व जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे,जुना पेट्रोल पंप ते आर. टी. ओ,दातार अळी बोरगाव रोड, तसेच शहरातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेलेआहेत,राजकारणी एकमेकांवर टीका करतात, पण सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे, पेण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची आहे, ही समस्या सोडवली नाही गेली तर याची तक्रार, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे नक्की जाणार... ही जनचक्र न्युजची हमी आहे...आता खुर्च्या बदलणार....!