महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे माजी संस्थापक अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले यांचे दुःखद निधन

          


कोलाड (श्याम लोखंडे ) : कोलाड स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याण कारी मंडळाचे माजी संस्थापक अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले यांचे बुधवार दि. २८ मे २०२५ रोजी दुःखद निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षाचे होते... ते अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होते...कोणी लहान असो अथवा मोठा जो त्यांना भेटला त्याला आदराने ते नमस्कार असत... तसेच कोलाड स्नेह जेष्ठ नागरिक संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता...त्यांनी कोलाड जेष्ठ नागरिकांना विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले... तसेच ते जेष्ठ नागरिकांच्या वर्षा सहलीसाठी नेहमीच तत्पर होते...त्यांच्या निधनामुळे कोलाड जेष्ठ नागरिक संस्थेमध्ये पोकळी निर्माण झाली आहे...    

 त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधी साठी कोलाड परिसरातील असंख्य जेष्ठ नागरिक, सामाजिक, राजकीय, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य नागरिक, त्यांचे नातेवाईक,व समस्त पहूर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, नातवंडे, व मोठा कुर्ले परिवार आहे...त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.६ जुन रोजी उद्धर रामेश्वर येथे तर उत्तर कार्यविधी (बारावे ) रविवार दि.८ जुन २०२५ रोजी त्यांच्या पहूर येथील  राहत्या निवास्थानी होणार आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post